आजच्या धावपळीच्या जगात आपण सर्वजण आपल्या कामात दिवसभर गुंतुन गेलेलो आहोत. दुर्दैवाने कुटुंबातील जिवलग व्यक्तीला अंथरुणावर पडुन राहायची वेळ आली अथवा बेडरेस्ट सांगितली तर मनात असूनही आपण पुरेसा वेळ देऊ शकत नाही. अशावेळी 'आधार' चे सहकार्य आपण घेऊ शकता.
निर्धास्तपणे आपण आपल्या कुटुंबातील रुग्णास 'आधार' वर सोपवा. इथे रुग्णांची काळजी खूप मायेने व्यवस्थितरित्या घेतली जाते. 'आधार' एक असे केंद्र आहे की रुग्णांना ते आपले 'घर' च वाटेल. मानसिक, शारीरिक आरोग्याची काळजी तसेच औषधोपचार, नर्सिंग केअर, जेवणखाण सर्वच गोष्टींची व्यक्तिगत काळजी इथे घेतली जाते. प्रसन्न वातावरण, हवेशीर जागा, आपल्या जिवलागांना आपण केव्हाही भेटु शकता.

अत्याधुनिक सुविधांसह तीस रुग्णांची सोयींनी सुसज्ज वास्तू.
प्रसन्न, हवेशीर सेमी स्पेशल रुम्स.
आवश्यकतेनुसार फिजिओथेरपिस्टची उपलब्धता.
प्रदुषण विरहित प्रसन्न वातावरण.
पारंपारिक सण, उत्सव, वाढदिवस, महापुरुषांच्या जयंती साजरे केले जातात.
अध्यात्मिक कार्यक्रम, प्रवचन, भजन आयोजित केले जातात.
करमणूक, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
वाचनासाठी भरपूर पुस्तके.
मनोरंजनासाठी टीव्ही.
खेळण्यासाठी कॅरम, पत्ते, बुद्धिबळ व इतर साहित्य
घरपोच नर्सिंग सेवा व रुग्णोपयोगी वैद्यकीय साहित्य पुरवठा वृद्ध स्त्री-पुरुषांसाठी आहे. ज्या व्यक्ती आपल्या घरांत अंथरुणावर खिळून आहेत व आपली वैयक्तिक काळजी घेण्यास असमर्थ आहेत, अशा व्यक्तींसाठी हा उपक्रम गेली काही वर्षे राबविला जात आहे.
उदा. अतिवृद्ध, मानसिक, शारिरीक, अर्धांगवायू, अस्थीरोग, अॅक्सीडेंटमुळे वा मोठ्या शस्त्रक्रियेमुळे अंथरुणावर खिळून असणाऱ्या रुग्णांना घरपोच नर्सिंग सेवा व वैद्यकीय साहित्य पुरवण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे गेली काही वर्षे केला जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे व समाज्यातून त्याचे कौतुक होत आहे.

सेवाभावी वृत्तीने व माफक मोबदल्यात सुरू असलेल्या या केंद्रात अपघातग्रस्त वयोवृद्ध, अर्धांगवायू, अंथरुणाला खिळलेले किंवा आजारांमुळे शुश्रूषेची गरज असलेल्या रुग्णांना सेवा दिली जाते. छोट्या कुटुंब व्यवस्थेमुळे रुग्णाची योग्य ती काळजी घेणे गैरसोयीचे असते.
तसेच पती-पत्नी दोघेही नोकरी व्यवसायात असतात किंवा नोकरी निमित्त परगावी असल्याने, एखाद्या घरातील वृद्धांची सोय व सेवा करणे कठीण असते.

अशा व इतर वैद्यकीय नर्सिंग सेवेची गरज असलेल्या व्यक्तींसाठी आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या वैद्यकीय नर्सिंग सेवा उपलब्ध करून देते.
तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवण्याचे काम तत्परतेने केले जाते, ज्यामुळे रुग्णांना योग्य वेळी आवश्यक उपचार आणि काळजी मिळू शकते.
या संस्थेत प्रशिक्षित व अनुभवी नर्सेसची निवड करून सेवेत रुजू करून घेतले जाते. संस्था, नातेवाईक, रुग्ण आणि डॉक्टर यांच्या मध्यवर्ती भूमिका नर्सेसना पार पाडावी लागते. रुग्णाची चालू असलेली उपचार पद्धती, व्यक्तीची शारीरिक, मानसिक व कौटुंबिक स्थिती समजून घेऊन सेवा दिली जाते.
समस्येचा प्रकार समजून घेऊन पुनर्वसनासाठी सहकार्य केले जाते. शारीरिक, अपंग, अंध, मतिमंद, कॅन्सर, गंभीर आजारी रुग्ण आणि गरजू ज्येष्ठ नागरिक यांना तत्पर, अतिविशेष सेवा दिली जाते. आजारांचे व उपचारांचे मूलभूत ज्ञान असणाऱ्या अनुभवी नर्सेस या सेवेत समाविष्ट आहेत. नर्सेस संस्थेने दिलेले नियम व अटी नुसार जबाबदारीने व सहृदयतेने कार्य करतात.
प्रशिक्षित नर्सेस
मध्यवर्ती भूमिका
मानसिक समज
सहृदय सेवा
विशेष रुग्ण सेवा
नियमबद्ध कार्य
नर्सिंग सेवेचा आर्थिक मोबदला रुग्ण सेवेच्या आवश्यकतेवर व सोयीस्कर वेळेवर अवलंबून असेल. मोबदला रुग्णसेवेचा प्रकार, वेळ यानुसार प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्रपणे ठरविला जातो. प्रशासकीय व्यवस्थापन देखभाल खर्च म्हणून नर्सिंग सेवेच्या १०% अतिरिक्त रक्कम संस्थेतर्फे आकारली जाते.
प्रशासकीय खर्च
१०% अतिरिक्त
नर्सिंग सेवेच्या रकमेवर संस्थेतर्फे आकारले जाते
अनुभवी नर्सेस व रुग्णसेवक (ब्रदर) उपलब्धतेनुसार व्यवस्था संस्थेद्वारे केली जाते.
स्पंजिंग, ड्रेस बदलणे व बेडशीट बदलणे.
इंजेक्शन, सलाईन व इतर औषध देणे.
ऑक्सीजन लावणे / काढणे.
सक्शनद्वारे श्वास नलिका साफ करणे.
कॅथेटर / लघवीची नळी घालणे / काढणे.
रक्तदाब, तापमान आणि साखर तपासणी.
रोजची इंजेक्शन देणे.
इन्सुलिनचे इंजेक्शन देणे.
ट्यूब / अन्ननलिकेतून जेवण देणे.
बेड पॅन देणे आणि साफ करणे.
जखमांचे ड्रेसिंग.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इतर नर्सिंग सेवा.
बाळ व बाळंतिनीला मसाज व अंघोळ घालणे.
घरी बाळ सांभाळण्यासाठी मावशी मिळेल.
पेशंट केअर विषयी मार्गदर्शन.
अवयव दान विषयी मार्गदर्शन.
संस्थेतर्फे रुग्णांना आवश्यक असणारी वैद्यकीय साधने व मशिनरी भाडे तत्वावर अत्यंत कमी दरात उपलब्ध करून दिली जातात.
Adjustable Beds
Oxygen Cylinder
Bed Pan
Pulse Oxymeter
Walker
Water / Air Bed
Oxygen Concentrator
Infrared Lamp
BP Apparatus
Toilet Chair
Suction Pump
Urinal
Wheel Chair
Nebulizer
Monitor
यामध्ये रुग्णांना सकाळी ऍडमिट करून संध्याकाळी घरी पाठवले जाते. त्यामध्ये काही तात्पुरत्या स्वरूपाचा उपचार केला जातो.
सलाईन लावणे.
सलाईन मधून इंजेक्शन देणे.
लघवीची नळी घालणे / काढणे.
जेवणासाठी पोटात नळी घालणे / काढणे.
डॉक्टर होम व्हिजीट.
घरपोच महिन्याचे औषधे.
ऑक्सिजन चे मशीन लावणे.
फिजियोथेरेपी.
समुपदेशन / कौसलींग.
रक्त, लघवी घरातून कलेक्शन.
बॉडी मसाज देणे.
अॅम्बुलन्स, रिक्षा सेवा.
घरपोच घरगुती जेवणाचा डबा.
याशिवाय रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक येईपर्यंत शव ठेवण्यासाठी विजेवर चालणारी शीतपेटी उपलब्ध आहे, ती आपल्या घरी नेऊन वापर करू शकता.
रुग्णासाठी घरी वापरलेल्या वस्तू — फोल्डिंग बेड, वॉकर, संडासची खुर्ची, एअर बेड, व्हील चेअर — अशा पेशंटच्या वस्तू तुम्ही संस्थेला भेट / दान देऊ शकता. त्या आम्ही गरजू रुग्णांसाठी वापर करू.